कृतिका नक्षत्र

कृतिका नक्षत्र

हिवाळ्यामध्ये सूर्य मावळण्याच्या वेळेस कृत्तिका नक्षत्र आपणास पूर्वेकडे उगवताना दिसेल. कृत्तिकांना ओळखणे फार सोपे आहे. कारण आपणास या नक्षत्रामध्ये एक-दोन ऐवजी सहा तारका जवळ जवळ दिसतील. फार पूर्वीपासून कृत्तिकांना निरनिराळी नावे देण्यात आली आहेत. वैदिक ऋषी यांना सप्तमातृका किंवा सप्त बहिणी म्हणत. काही ठिकाणी यांना वस्तर्‍याची उपमा देण्यात आली. तर काहींना हे नक्षत्र एखाद्या द्राक्षाच्या घोसाप्रमाणे दिसते. तर काहींनी ह्यांना उडत्या पतंगाची उपमा दिलेली आहे. 
कृत्तिकांचा उल्लेख वर सात तारका म्हणून जरी केला असला तरी नीट पाहिल्यास आपणास त्या ठिकाणी सहाच तारका पाहाव्यास मिळतील. बहुतेक नक्षत्र संग्रहात कृत्तिकांचा उल्लेख ७ तारकाच म्हणून केला जातो. तर मग आज ६ तारका कशा दिसतात?

 त्यातील एक तारका नाहीशी झाली असा विचार केल्यास असे लक्षात येते की बहुदा नंतरच्या काळात त्या सातव्या तारकेचा स्फोट झाला असावा. म्हणून आजच्या संशोधकांना ह्या कृत्तिका नक्षत्रा भोवती एक धूसर अभ्रिकेचे आवरण आढळले आहे.

कृत्तिकांना इंग्रजीमध्ये 'प्लिड्सअसे म्हणतात बहुदा हा शब्द 'प्लिहादीहीया संस्कृत शब्दाचा अपभ्रंश असावा.

ह्या सहा तारकांपैकी जी सर्वात तेजस्वी तारका दिसते तिचे नाव अंबा. ही आपल्या सूर्याच्या कित्येक पट तेजस्वी आणि आकाराने मोठी आहे. तर उरलेल्या तारकांची नावे दुलानितत्नीअभ्रयंतीमेघयंती आणि वर्षयंती आहेत. कृत्तिकांमध्ये सात तारका असल्याचे आणखी एक कारण म्हणजे त्या सातव्या तारकेचे नाव चुपुणिका असल्याचे काही साहित्यांमध्ये सापडते.

एका कथे नुसार

महादेवाचा पुत्र षडाननाचे मातृत्व कृत्तिकांकडे आहे. शंकरामुळे अग्नीस गर्भ राहिला. अग्नीस लाज वाटून त्याने एका सरोवरात गर्भाचा त्याग केला. त्या सरोवरातील सहा बहिणींनी हा गर्भ धारण केला व एका पुत्राला जन्म दिला. या अदभुत जन्मामुळे षडाननास सहा मुखे ( तोंड ) निर्माण झाली. कृत्तिकांमुळे षडाननाचे नाव कृत्तिकेय असे पडले.

दुसर्‍या एका कथेनुसार

अवकाशातील उत्तरेस ध्रृवतार्‍याशेजारी एक काहीसा पतंगाच्या आकाराचा तारकासमूह आहे. ज्यास सप्तर्षी असे म्हटले जाते. म्हणजेच ते सात ऋषी आहेत. तर कृत्तिकांना ह्या सप्तर्षीच्या ऋषीपत्नी म्हटले जाते. एकदा हिवाळ्यात खूप थंडी पडली असता ह्या ऋषीपत्नीपैकी वसिष्ठपत्नी अरुंधती सोडून इतर सहा जणी उबेसाठी अग्नीजवळ गेल्या. अरुंधती पतिव्रता म्हणून प्रसिद्ध झाली. तर बाकीच्या सहा कृत्तिकांच्या या व्यभिचारी कृत्याचा सप्तर्षींना फार राग आला व तेव्हा पासून त्यांनी कृत्तिकांचे तोंड न पाहायचे ठरविले. ह्या कथेचा संदर्भ आपणास पडताळायचा असल्यास हिवाळ्यामध्ये आकाशाचे निरीक्षण केल्यास आपणास कृत्तिका रात्रभर दिसतात व वरील कथेमध्ये उल्लेखलेला अग्नी हा तारा त्याच्या शेजारीच असलेल्या सारथी या तारकासमुहात आढळेल. तसेच सप्तर्षींनी रागाने कृत्तिकांचे तोंड न पाहण्याचे ठरविले या वाक्यातील सत्यता पडताळायची असल्यास निरीक्षण केल्यास आपणास दिसेल की कृत्तिका आकाशात मावळण्यासाठी पश्चिमेकडे सरकल्या शिवाय सप्तर्षी उगवत नाहीत.

कृतिका नक्षत्राची भविष्यवाणी
१) तुम्ही चांगले सल्लागार आणि सकारात्मक व्यक्ती आहात. रुबाबदार वागणूक हे तुमचे वैशिष्ट्य आहे आणि सुखवस्तू आयुष्य जगाल. 
२) तुमचा चेहरा अत्यंत चैतन्यपूर्ण आहे आणि तुमचा चालण्याचा वेगसुद्धा जलद आहे. इंग्रजीमधील क्रिटिकल हा शब्द कृतिका या शब्दावरून बेतलेला आहे. त्यामुळेच तुम्ही दुसऱ्यामधील उणीवा बारकाईने पाहता आणि ते सुधारण्याचा प्रयत्न करता. 

३) त्याचप्रमाणे एखाद्या कामाच्या निष्कर्षाचे विश्लेषण करण्यात तुम्ही तज्ज्ञ आहात आणि त्यातील छुपे फायदे-तोटे तुम्ही शोधू शकता. 

४) तुम्ही नेहमी तुमचा शब्द पाळता आणि तुम्हाला समाजसेवेत रुची अाहे. 

५) तुम्ही प्रसिद्धीपराङ्मुख आहात आणि तुम्हाला कुणाकडूनही उपकार नको असतात. 

६) तुमचा स्वावलंबनावर विश्वास आहे. त्याचप्रमाणे तुम्ही परिस्थितीशी जुळवून घेत नाही आणि तुम्ही तुमच्या निर्णयांवर ठाम असता. तुमचे बाह्यरूप कठोर वाटू शकतेपण तुमच्या आत मात्र खूप प्रेममायाकारुण्य भरलेले आहे. केवळ बेशिस्त वागण्यामुळे तुम्हाला प्रचंड राग येतो. तुम्हाला कुणालाही घाबरवायची इच्छा नसते. 

७) याशिवाय तुम्हाला आध्यात्मात रुची असेल. जपतपउपवास इत्यादी मार्ग अनुसरून तुम्ही आध्यात्मिक प्रगती साधाल. एकदा तुम्ही आध्यात्मिक मार्गावर चालायचे ठरवले कीतुम्हाला तिथे जाण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. 

८) तुम्ही मेहेनती व्यक्ती असून एखादी गोष्ट नियमितपणे करण्यावर तुमचा विश्वास आहे. शिक्षण असोनोकरी किंवा व्यवसाय असोतुम्हाला सर्वांच्या पुढे राहायचे आहे. अपयश आणि मागे राहणे तुम्ही सहनच करू शकत नाही. 

९) तुम्ही खूप प्रामाणिक असल्यामुळे फसविले जाण्याचीही शक्यता आहे. जर तुम्ही तुमच्या जन्मस्थळापासून जास्तीत जास्त काळ लांब राहिलात तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. 

१०) दुसऱ्याला समस्या सोडविण्यासाठी चांगला सल्ला देऊ शकण्याची क्षमता तुमच्यात आहे. 

११) तुम्हाला दुसऱ्या कोणाच्या दयेने किंवा चुकीच्या मार्गाने मिळणाऱ्या प्रसिद्धीसंपत्तीची हाव नाही. तुमच्याकडे अर्थाजन करण्यासाठी उत्तम कौशल्य आहे आणि कष्टाने कोणतेही ध्येय साध्य करण्याची तुम्हाला सवय आहे. तुम्ही आयुष्यात स्वत:च्या नियमांनुसार आणि तत्वांनुसार चालणारी व्यक्ती आहात. तुम्हाला संगीत आणि कलेत विशेष रुची असेल. त्याचप्रमाणे तुम्ही दुसऱ्याला चांगल्या प्रकारे शिकवू शकता.

शिक्षण आणि उत्पन्न
तुम्ही बहुतेक वेळा तुमच्या जन्मस्थळी राहत नाही. तुम्ही कामानिमित्त विविध ठिकाणी फिरत असता. औषधविक्रेता (फार्मसिस्ट)अभियांत्रिकीदागिन्यांशी संबंधित कामविद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी किंवा खात्याचे अध्यक्षवकीलन्यायाधीशलष्करपोलीस किंवा सुरक्षा दलअग्निशमन अधिकारीबालसुरक्षा विभागअनाथालयाशी संबंधित कामव्यक्तिमत्त्व विकास किंवा आत्मविश्वासवृद्धीशी संबंधित कामआध्यात्मिक गुरू किंवा वक्ताआगीशी संबंधित व्यवसाय म्हणजे मिठाईबेरीवेल्डिंगस्मिथिंगशिवणकाम-एब्रॉयडरीसिरॅमिकभांडी तयार करणे आणि ज्या कामांमध्ये आगीशी किंवा धारदार वस्तूंशी संबंध आहे ते व्यवसाय तुमच्यासाठी नशीबवान ठरू शकेल.
कौटुंबिक आयुष्य
तुमचे वैवाहिक आयुष्य सुखाचे असेल. तुमचा जोडीदार कौशल्यपूर्णवचनबद्धनिष्ठावान आणि घर सांभाळणारा असेल. घरात इतके चांगले वातावरण असूनही तुमच्या जोडीदाराची प्रकृती मात्र काळजी करण्यासारखी असेल. तुमची तुमच्या आईशी जवळीक आहे आणि तुमच्या भावंडांपेक्षा तुमच्या आईकडून तुम्हाला जास्त प्रेम मिळेल. वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत तुमचे आयुष्य खडतर असेल. पण ५० ते ५६ वर्षांचा काळात मात्र अनेक आश्चर्यकारक गोष्टी घडतील.
नक्षत्र: कृतिका

नक्षत्र देवता : अग्नी

नक्षत्र स्वामी : रवि

नक्षत्र आराध्य वृक्ष : उंबरऔदुंबर

राशी व्याप्ती : १ले चरण मेष राशीमध्ये,

बाकीचे ३ चरण वृषभ राशीमध्ये
नक्षत्र प्राणी: बकरी

नक्षत्र तत्व :अग्नी

नक्षत्र स्वभाव : क्रूर

वेद मंत्र
*ॐ अयमग्नि सहत्रिणो वाजस्य शांति गवं*

*वनस्पति: मूर्द्धा कबोरीणाम । ॐ अग्नये नम: ।*

पौराणिक मंत्र:

*कृतिका देवतामाग्निं मेशवाहनं संस्थितम् l*

*स्त्रुक् स्तुवाभीतिवरधृक्सप्तहस्तं नमाम्यहम् ll*

नक्षत्र देवता नाममंत्र:-

*ॐ आग्नेय नमः*

नक्षत्र नाम मंत्र :

*ॐ कृतिकाभ्यो नमः*

SATISH SOMNATHE

jyotish shiromani

contact for appointment..7218551701