ग्रहासाठी
विशिष्ठ रत्ने
आपण नेहमी बघतो आपण जे काम करत असतो त्यामध्ये हवं तसं यश आपल्याला बऱ्याचदा मिळतंच असं नाही. आपण कितीही मेहनत करत असलो तरीही त्यामध्ये यश मिळत नसतं. त्यामागे आपल्या पत्रिकेतील ग्रह कारणीभूत असतात असं म्हटलं जातं. ग्रहांचा वाईट प्रभाव असल्यास, आपल्या जीवनात बऱ्याच संकटांचा सामना करावा लागतो. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, प्रत्येक राशीचा स्वभाव वेगळा असतो. त्यामुळेच प्रत्येक रत्नाचा प्रत्येक राशीवर वेगळा- वेगळा प्रभाव असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्तीने आपल्या राशीनुसार रत्न अर्थात खडा आपल्या बोटामध्ये घातला तर मेहनतीसह त्याला आरामात यश मिळतं. त्यामुळे आपणही कोणत्या राशीसाठी कोणतं रत्न शुभ आणि कोणतं रत्न अशुभ आहे हे जाणून घेऊया.प्रत्तेक ग्रहासाठी विशिष्ठ रत्न असून कोणते रत्न कोणत्या ग्रहाच्या आधिपत्याखाली येते हे ठरलेले असते.
मोती :- या रत्नावर चंद्राचे आधिपत्य आहे चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे हे रत्न मनाची विशालता, कल्पनाशक्ती व वैचारिक क्षमता वाढवते. कवी,लेखक,चित्रकार,संगीतकार क्षेत्रातील व्यक्तीना मोती या रत्नाचा विशेष लाभ होतो. तापट व्यक्तिमत्वाच्या लोकांनी हे रत्न धारण केल्याने स्वभावात बराच फरक पडतो. मोती हे थंड प्रकृतीचे रत्न आहे. हे रत्न सोमवारी चंद्राच्या होर्यात चांदी ह्या धातूत करंगळीत धारण करावे.
मंत्र :- ॐ सों सोमाय: नमः ( मंत्र जाप संख्या ११००० )
पोवळे :- या रत्नावर मंगळ या ग्रहाचे अधिपत्य आहे. हे रत्न लाल किवा शेंदरी रंगाचे असते. तसेच सफेद किवा काळसर रंगाची सुद्धा पोवळी आढळतात. ज्याना साहसाची कामे करायची असतात अशा लोकांनी पोलीस, सैन्य ई. क्षेत्रात काम करणार्यांनी हे रत्न वापरावे. नेभळट व थंड व्यक्तिमत्वाच्या लोकांना याचा विशेष लाभ होतो. या रत्नामुळे अधिकार आणि प्रतिष्ठा वाढते.तापट व्यक्तींनी हे रत्न धारण करू नये.
हे रत्न मंगळवारी मंगळाच्या होऱ्यात तांबे किवा सोने ह्या धातूत अनामिका किवा तर्जनी मध्ये धारण करावे .
मंत्र :- ॐ अं अंगारकाय नमः ( मंत्र जाप संख्या १०००० )
हिरा :- हे रत्न शुक्र ग्रहाच्या अधिपत्या खाली येते. शुक्र हा वैवाहिक सुख तसेच प्रणय सुखाचा,कलेचा व सौदर्याचा कारक ग्रह आहे. त्या मुळे सुखी वैवाहिक जीवनासाठी,विवाह होण्यासाठी हे रत्न वापरावे. वीर्यदोष किवा तत्सम उणीवा असणार्याना त्याचा लाभ होतो. कलाकार,अभिनेते,अभिनेत्री आणि सौदर्यवर्धक वस्तूंचा व्यापार करणार्यांनी हे रत्न वापरावे. हे रत्न शुक्रवारी शुक्राच्या होऱ्यात तर्जनी किवा अनामिकेत सोने किवा प्लैटिनम मध्ये धारण करावे.
मंत्र :- ॐ शुं शुक्राय नम: ( मंत्र जाप संख्या १६००० )
नीलम :- या रत्नावर शनीचे अधिपत्य आहे .हे रत्न गडद निळ्या किवा जांभळ्या रंगाचे असते. हे रत्न वारसा हक्काने होणारी धनप्राप्ती,जमीन खाणी इ. व्यवहारापासून होणारा धनलाभ दर्शवते.हे रत्न प्रामाणिकपणे .मेहनत करणार्याला लोकाना लाभ मिळवून देते.संधिवात, सांधेदुखी इ.आजारान मध्ये हे रत्न लाभदाई ठरते.खर्चिक वृत्तीच्या लोकांनी हे रत्न घातल्यास खर्च करण्यावर नियंत्रण येते. हे रत्न ज्याना लाभते त्यांचा खूपच फायदा होतो.हे रत्न भाग्य खेचून आणते. हे रत्न शनिवारी शनीच्या होऱ्यात मध्यमेत चांदीत धारण करावे.
मंत्र :- ॐ शं शनैश्चराय नमः ( मंत्र जाप संख्या २३००० )
माणिक :- हे रवि ग्रहाचे रत्न आहे. हे रत्न सामान्यत डाळिंबी लाल रंगाचे असते. रवि हा आरोग्याचा कारक ग्रह असल्याने या रत्नाचा वापर केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते व आरोग्य सुधारते. ब्लडप्रेशर व हृद्यविकाराच्या रुग्णांना विशेष लाभ होतो. हे रत्न धारण केल्याने आत्मविश्वास आणि मनोधेर्य वाढते. माणिक रक्तसंबंधी विकारात सुद्धा फायदेशीर आहे. हे रत्न रविवारी रविच्या होऱ्यात सोने ह्या धातूत अमामिकेत धारण करावे.
मंत्र :- ॐ घृणी: सूर्याय नमः ( मंत्र जाप संख्या ७००० )
पाचू :- हे बुधाच्या मालकीचे रत्न आहे . हे पोपटी किवा गर्द हिरव्या रंगाचे असते त्यांमध्ये गर्द हिरव्या रंगाचे रत्न जास्त चागले मानले गेले आहे. व्यापार-व्यवसाय करणार्या लोकांना, विक्रेते, वक्ते, प्रवचनकार, ज्योतिषी, राजकारणी या लोकांना हे रत्न अत्यंत फलदायी आहे. अर्थात ज्या ठिकाणी बोलनेचातुर्य अपेक्षित असते त्या ठिकाणी हे रत्न उपयोगी ठरते. तसेच ज्यांना वाचा दोष आहे, अडखळत बोलण्याची सवय आहे किवा नर्वस सिस्टीमचे आजार आहेत, अशा लोकांना या रत्नाचा फायदा होतो. हे रत्न स्मरणशक्ती वाढवणारे आहे. हे रत्न बुधवारी बुधाच्या होऱ्यात सोने किवा चांदीत करंगळीत धारण करावे.
मंत्र :- ॐ बुं बुधाय नमः ( मंत्र जाप संख्या ९००० )
पुष्कराज :- या रत्नाचे अधिपत्य गुरु या सात्विक ग्रहाकडे आहे. त्यामुळे हे रत्न वापरल्याने सहसा नुकसान होत नाही. हे रत्न सोनेरी पिवळ्या , गुलाबी ,किवा सफेद रंगाचे असते. हे रत्न मन:शांती देणारे, सात्विक वृत्ती वाढवणारे, अध्यामात प्रगती घडवून आणणारे आहे.गुरु हा विद्येचा कारक असल्याने विद्यार्थी,अध्यापक,शिक्षक व राजकारणी लोकांना याची शुभ फले मिळतात. तसेच गुरु हा ग्रह वृद्धी कारक असल्याने सांपत्तिक स्थिती व संतती सौख्यासाठी या रत्नाचा उपयोग चागला होतो. हे रत्न गुरुवारी गुरुच्या होऱ्यात सोने या धातूत तर्जनी मध्ये धारण करावे.
मंत्र :- ॐ बृं बृहस्पतये नम: ( मंत्र जाप संख्या १९००० )
गोमेद :- हे राहूचे रत्न आहे.या रत्नाचा रंग गोमुत्रासारखा किवा तांबूस असतो. पिशाच्च्याबाधा होवू नये म्हणून वापरतात. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी हे रत्न वापरतात. हे रत्न पंचधातु किवा अष्टधातु मधे गुरूवारी किवा शनीच्या होऱ्यात अनामिकेत धारण करावे.
मंत्र :- ॐ रां राहवे नमः ( मंत्र जाप संख्या १८००० )
लसण्या :- हे केतू चे रत्न आहे.हे रत्न दुधाळ रंगाचे किवा मांजरीच्या डोळ्याप्रमाणे असते. पिशाच्च्याबाधा, करणीबाधा,वाईट स्वप्ने यांपासून संरक्षण करण्यासाठी या रत्नाचा उपयोग होतो.एखाद्याला नैराश्याने ग्रासले असेल किवा मानसिकदृष्ट्या खचलेली व्यक्ती असेल,आत्मविश्वास डळमळीत झाला असेल तर हे रत्न लाभदायी ठरते. हे रत्न गुरुवार्री गुरुच्या होऱ्यात चांदीत करंगळीत धारण करावे.
मंत्र :- ॐ कें केतवे नमः ( मंत्र जाप संख्या १७००० )
काही विशिष्ठ रत्ने जसे कि लसण्या - हिरा, पोवळे - नीलम, नीलम - माणिक हि एकाचवेळी धारण करू नयेत. ग्रहांची अवस्था किंवा दशा - अंतर्दशा असता एकावेळी धारण केल्यास फलदायी होतात.
मोती सोबत – नीलम,हीरा, पन्ना,गोमेद, लहसुनिया वर्जित आहे.
मूंगा सोबत- पन्ना, हीरा, गोमेद, लहसुनिया वर्जित आहे.
हीरा सोबत – माणिक्य, मोती, मूंगा, पुखराज वर्जित आहे.
नीलम सोबत – माणिक्य, मोती, पुखराज वर्जित आहे.
माणिक्य (माणिक) सोबत – नीलम, गोमेद, लहसुनिया वर्जित आहे.
पन्ना सोबत – मूंगा, मोती वर्जित आहे.
पुखराज सोबत – हीरा, नीलम, गोमेद वर्जित आहे.
गोमेद सोबत – माणिक्य, मूंगा, पुखराज वर्जित आहे.
लहसुनिया सोबत – माणिक्य, मूंगा, पुखराज, मोती वर्जित आहे.
SATISH SOMNATHE
jyotish shiromani
contact for appointment..7218551701