नक्षत्रांची माहिती


नक्षत्रांची माहिती


*अश्विनी नक्षत्र *
27नक्षत्राची सुरुवात अश्विनी नक्षत्राने होते. आपण जरी वर्षाची सुरुवात जानेवारी १ तारखेपासून करीत असलो तरी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अश्विनी नक्षत्रापासून नवीन वर्षास आरंभ होतो. आपण या नक्षत्रास प्रथम नक्षत्र मानतो. सूर्याचा या नक्षत्रामध्ये प्रवेश म्हणजे नूतन वर्षारंभ होय.
या नक्षत्राचा समावेश मेष राशीमध्ये होतो. एकूण १२ राशीमध्ये मेष राशी देखिल आपण प्रथम रास म्हणून मानतो.
आकाशात तीन ठळक तारकांचा समूह मिळून ही रास तयार होते. आपणास या तारकांचा विशालकोन तयार झालेला आढळतो. या तीन तारकांशिवाय आणखी काही तारे या नक्षत्रात आढळतात. परंतु ते सारेच मंदतेज आहेत.
*या नक्षत्रा संबंधीची एक सुंदर वेदकालीन कथा आपल्या येथे आढळते.*
मधुविद्या (मृताला जीवदान देणारी विद्या अशी कल्पना असावी) दधिची ऋषींना येते असे. अश्विनीकुमार हे देवतांचे वैद्य. तर अश्विनीकुमार यांना दधिची कडून ही विद्या शिकावयाची होती. पण इंद्राला ते नको होते. दधिचीला इंद्राने भीती घातली की अश्विनीला ही विद्या शिकविल्यास दधिचीचा शिरच्छेद करण्यात येईल. त्यामुळे अश्विनीकुमार यांनी अशी योजना आखली की दधिचींनी आधीच आपला शिरच्छेद करावा. व त्यास घोड्याचे डोके लावून घ्यावे. म्हणजे इंद्राने दधिचींचा शिरच्छेद केला तर पुन्हा त्यांना त्यांचे डोके लावण्यात येईल व ठरल्याप्रमाणे दधिचींचे मूळ डोके त्यांना परत लावण्यात आले. बहुदा अश्विनीकुमार या नावावरून पुढे या नक्षत्राचे नाव अश्विनी ठेवण्यात आले असावे.
आपण ज्या प्रमाणे या नक्षत्राचा समावेश मेष राशीमध्ये करतो. मेष म्हणजे मेंढा, त्याच प्रमाणे पाश्चात्यांनी देखिल या तारकासमुहास ऐरीस (मेंढा) हेच नाव दिले आहे. 
*ग्रीक पुराणामध्ये या मेंढ्यासंबंधी एक कथा आढळते.*
थेबिसचा राजा अस्थमस याला फ्रिक्सर आणि हेले ही दोन मुले होती. पण या मुलांची सावत्र आई इनो त्यांना फार जाच करी. देवांचा दूत मर्क्युरी याला एक दिवस कळले की इनो आपल्या दोन्ही सावत्र मुलांना ठार मारणार आहे. तेव्हा मर्क्युरीने एक सोनेरी केसांचा मेंढा या दोन्ही मुलांना वाचविण्यासाठी पाठविला. दोन्ही मुलांना घेऊन हा मेंढा आकाशात उडाला पण वाटेत येणार्‍या एका समुद्रावरून जाताना हेलेच्या हाताची पकड सुटली व तो समुद्रात कोसळला (हे ठिकाण म्हणजे दादा नेल्सची समुद्र धुनी. अजूनही ते ठिकाण हेलिस्पॉट म्हणून ओळखले जाते.) फ्रिक्सर मात्र काळ्या समुद्राच्या किनारी सुखरूप उतरला. 
आपल्या सुटकेसाठी देवाचे आभार म्हणून तो मेंढा त्याने देवाला बळी दिला व त्याची सोनेरी लोकर तिथल्या राज्याला भेट दिली. ही ग्रीक पुराणकथा अजूनही फार प्रसिद्ध आहे.
खरेतर 'वसंतसंपात' बिंदू (आयनिकवृत्त व खगोलीय विषुववृत्त यांना जोडणारे स्थान) ज्या राशीमध्ये असेल ती पहिली रास अथवा ज्या नक्षत्रास असेल ते नक्षत्र प्रथम मानावे. साधारणात ज्यावेळेस कलगणनेस सुरुवात झाली त्याकाळी 'वसंतसंपात' बिंदू अश्विनी नक्षत्रामध्ये म्हणजेच मेष राशीमध्ये होता. परंतु पृथ्वीच्या परांचन गतीमुळे हा बिंदू सरकत-सरकत सध्या रेवती नक्षत्रामध्ये (मीन राशीमध्ये) आला आहे. म्हणजे नक्षत्र गणना रेवती नक्षत्रा पासून करावयास हवी. पण काही कारणांमुळे हा बदल करावयाचा राहून गेला. म्हणून अश्विनी नक्षत्र व मेष राशीचा अग्रक्रम कायम राहिला.
*अश्विनी नक्षत्राची भविष्यवाणी*
१) तुम्ही स्वभावाने बऱ्यापैकी उत्साही आणि क्रियाशील आहात. त्याचप्रमाणे तुम्ही नेहमीच खूप उत्साही असता.
२) मूलभूत गोष्टींनी तुम्हाला समाधान मिळत नाही आणि तुम्ही नेहमी काहीतरी मोठे ध्येय साध्य करण्यासाठी धडपडत असता. 
३) आपले काम लवकरात लवकर संपवणे हे तुमच्या स्वभावातच आहे. वेग, उर्जा आणि क्रियाशीलता तुमच्यात स्पष्टपणे दिसून येते. 
४) तुमच्या डोक्यात एखादी कल्पना आली, तर तुम्ही लगेचच ती कल्पना अमलात आणता.
५) तुम्ही खिलाडूवृत्तीचे आणि बुद्धिमान आहात. 
६) तुमचा सर्वात चांगला गुण म्हणजे तुम्ही सर्वकाही व्यवस्थित जाणून घेतल्यावरच योग्य तो निर्णय घेता. 
७) तुमच्या स्वभावातच एक प्रकारचा गुढपणा आहे, ज्यामुळे तुम्हाला धार्मिक, अलौकिक आणि गुप्त ज्ञानाबद्दल कुतूहल असते. 
८) तुम्ही बिनधास्त आणि धाडसी आहात, पण तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. 
९) शत्रूकडून तुम्हाला फारसा त्रास संभवत नाही, कारण त्यांना कसे सामोरे जयचे हे तुम्हाला नीट माहीत आहे. 
१०) सत्ता, दबाव किंवा इतर कोणत्याही कारणामुळे तुम्ही वश होऊ शकत नाही, केवळ प्रेम आणि ममतेने तुम्हाला जिंकता येऊ शकेल. 
११) तुमच्या बाह्यरुपावरून तुम्ही शांत आणि संयमी वाटता; जो कधीही घाईघाईत निर्णय घेत नाही. एखाद्या गोष्टीबाबत सखोल विश्लेषण केल्यावरच तुम्ही निर्णय घेता आणि एकदा तुम्ही एखादा निर्णय घेतला की, तो बदलण्याची शक्यता फारच कमी असते. दुसऱ्याच्या प्रभावाचा तुमच्या निर्णयावर परिणाम होणे तुमच्या स्वभावात नाही. तुमचे काम पूर्ण कसे करायचे याची तुम्हाला चांगली समज आहे. 
१२) या सगळ्याबरोबरच तुम्ही एक चांगले मित्र आहात. तुमच्या जवळच्यांसाठी तुम्ही काहीही करू शकता. तुम्हाला एखादा कुणी संकटात सापडलेला दिसला तर तुम्ही त्याला शक्य तेवढी मदत देऊ करता. परिस्थिती कितीही बिघडली तरी तुम्ही शांत असता आणि तुमची इश्वरावरील श्रद्धा अढळ असते. एकीकडे तुम्हाला परंपरांविषयी प्रेम असले तरी तुम्ही नवीन विचारांचाही स्वीकार करता. या सगळ्याबरोबरच तुम्ही तुमचे आजुबाजूचे वातावरण स्वच्छ आणि नीटनेटके ठेवता.
*शिक्षण आणि उत्पन्न*
तुम्ही अष्टपैलू आहात. याचा अर्थ तुम्हाला बहुतेक प्रत्येक विषयाच्या बाबतीत थोडी माहिती निश्चित असेल. तुमच्या करिअरमध्ये शैक्षणिक विभाग तुमच्यासाठी उत्तम असेल. असे असले तरी तुम्ही औषधशास्त्र, सुरक्षा, पोलीस, लष्कर, गुप्त सेवा, अभियांत्रिकी, शिक्षक, प्रशिक्षण इत्यादी क्षेत्रांमध्येही प्रयत्न करू शकता. तत्त्वज्ञान आणि संगीताकडे तुमचा ओढा असेल आणि यातूनही तुम्हाला अर्थार्जन करता येऊ शकेल. वयाच्या तीसाव्या वर्षापर्यंत तुम्हाला अनेक चढउतार पाहावे लागतील.
*कौटुंबिक आयुष्य*
तुमचे तुमच्या कुटुंबावर जीवापाड प्रेम आहे. असे असले तरी तुमचे तुमच्या वडिलांशी काही वाद होण्याची शक्यता आहे. पण तुमच्या आईकडील नातेवाईक नेहमीच तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि परिवाराच्या बाहेरील लोकांकडूनही तुम्हाला मदत मिळू शकते. तुमचे वैवाहिक आयुष्य आनंददायी असेल. तुम्हाला कन्यारत्नांपेक्षा पुत्ररत्न अधिक असतील.
नक्षत्र: अश्विनी
नक्षत्र देवता : अश्विनीकुमार
नक्षत्र स्वामी : केतु
नक्षत्र आराध्य वृक्ष : कुचला
राशी व्याप्ती : ४ हि चरण मेष राशीमध्ये
नक्षत्र प्राणी: घोडा
नक्षत्र तत्व : वायु
नक्षत्र स्वभाव : शुभ
*वेद मंत्र*
*ॐ अश्विनौ तेजसाचक्षु: प्राणेन सरस्वती वीर्य्यम वाचेन्द्रो*
*बलेनेन्द्राय दधुरिन्द्रियम ।*
*ॐ अश्विनी कुमाराभ्यो नम: ।*
*पौराणिक मंत्र:*
*अश्विनी देवते श्वेतवर्णो* *तौव्दिभुजौ स्तुमः*
*सुधासंपुर्ण कलश कराब्जावश्च वाहनौ ll*
नक्षत्र देवता मंत्र:
अ)ॐअश्विनी कुमाराभ्यां नमः
आ) ॐ अश्विभ्यां नमः
नक्षत्र नाम मंत्र:-
ॐ अश्वयुगभ्यां नमःl            

SATISH SOMNATHE

jyotish shiromani

contact for appointment..7218551701